Posts

Showing posts from 2018

माणूसपण

काही दिवसांपूर्वी room पासुन काही अंतरावर 2 two wheeler चा accident झाला; एका गाडीवर बसलेली महिला पडून तिच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला... बघ्यांची गर्दी वाढू लागली. मी पण माझी गाडी थांबवून त्या दिशेने गेलो... काही लोक गाडी उचलून देत होते, काही पडलेल्या लोकांना उचलत होते... पण त्या महिलेला सावरण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते... काही लोक गाडीवरूनच अपघात न्याहाळून आपला प्रवास अखंडतेने करत होते... अचानक 2दिवसांपूर्वी ज्या 6 seater मध्ये मी प्रवास केला तो Driver-ज्यानं त्यादिवशी एका मावशींसोबत काही रूपायांवरून आकाश-पाताळ एक केलं तो आला... त्याने त्या अपघातग्रस्त महिलेला रस्त्याच्या कडेला घेतलं आणि त्याच्या गाडीतील दोन मुलींना त्याच्या रांगड्या शैलीत आवाज दिला आणि डोकं-कान पकडा असा थेट आदेश दिला... कोणास ठाऊक कुठून तरी पाण्याची bottle आणून तिच्या माथ्यावर पाणी मारायला सांगून त्या महिलेसोबत असणाऱ्या मुलाला धमकी वजा आदेश दिला आणि पुन्हा स्वतःच्या गाडीतील प्रवाशाला एखादी गाडी थांबण्यास सांगून अपघातग्रस्त गाडी उचलणाऱ्या मला अक्षरशः ओढून त्या महिलेसोबतच्या मुलाला घेऊन जाण्याचा आदेश दिला... म...

मोठी आई

मोठी आई आई, काही पक्क्या कच्च्या धाग्यात विणलेल्या असंख्य आठवणी आज मनात दाटून आल्या आहेत... तुझ्याबद्दल बोलताना, मन भरून येत... डोळ्यातून झरून येत... आई आठवते पुसटशी तू मला सुप्रियाला पाठीशी अन बोट पकडून मधुराताई तुझ्या मुंगीला घेऊन कामं उरकणारी, आई आठवते तू मला चुलीत आग फुकणारी, आई आठवते तू मला धगधगत्या निखाऱ्या वर भाकऱ्या भाजणारी, आई आठवते तू मला, कितीही दमून आली तरी नेहमीच डोकं-अंग दुखणाऱ्या दादा वर उपचार करणारी... आई आठवते तू मला, मानसिक-शारीरिक वेदनासहन करून सुद्धा नातलगांना सांभाळणारी... आई आठवते तू मला, शेतात राब राब राबणारी आणि घरी आल्यावर तुझ्या खडबडीत हातांनी पाट्यावर मसाला वाटणारी, आई आठवते तू मला, कोणाचीही पर्वा न करता माझे लाड करणारी, आई आठवते तू मला, सुट्टीच्या प्रत्येक दिवशीच्या रात्री 'लेकराकडून किती काम करून घेतलं' म्हणत कुरवळणारी... आई आठवते तू मला, जरी Mummy च्या शिक्षण आणि नोकरी आई (बारकी) पाठिंबा दिला तरी त्या साठी लागणार वातावरण निर्माण करणारी... आई आठवते तू मला, कोणालाही आपल्या ताटात जेवू घालणारी... आई आठवते तू मला, अपार दुःख सहन करणारी...

आजी

आम्ही आजीला आई म्हणत असू... ती गेल्यानंतर तिच्याविषयी... तिच्याबद्दल लिहिताना, मन भरून येत... डोळ्यातून झरून येत... आई तू आठवते मला सतत गोतावळ्यात रमणारी, आई तू आठवते मला कोणालाही जेवल्याशिवाय घर सोडू न देणारी, आई तू आठवते मला सिनेमा-नाटकाची कथा सांगणारी, आई तू आठवते मला मांडी वर डोकं ठेवल्यावर आमचीच नाव असलेली गाणी गाणारी, आई तू आठवते मला जिवलगांच्या जाण्यानंतरसुद्धा धारदार चालणारी, आई तू आठवते मला मुंबई सारख्या शहरात लहानपण जाऊनसुद्धा गावच्या मातीशी एकरूप होणारी, आई तू आठवते मला जुनाट साड्यांतून गोधडी साकारणारी, आई तू आठवते मला चुलीत आग फुकणारी, आई तू आठवते मला हातावर शेंगुळी साकारणारी, आई तू आठवते मला सुरकुतल्या हातांनी गाल कुरवळणारी, आई तू आठवते मला थरथरत्या ओठांनी कपाळावर मुका घेणारी, आई तू आठवते मला पप्पानी library मधून आणलेली पुस्तके जपाटलेल्या गत वाचणारी, आई तू आठवते मला वाचलेल्या गोष्टी तुझ्या अनोख्या शैलीत सांगून आम्हाला मंत्रमुग्ध करणारी, आई तू आठवते मला तुझ्या मम्मीला लग्नानंतर शिक्षण अन् नोकरीला प्रोत्साहन देणारी, आई तू आठवते मला पाया पडल्यावर 'बाबास...