आजी

आम्ही आजीला आई म्हणत असू...
ती गेल्यानंतर तिच्याविषयी...

तिच्याबद्दल लिहिताना, मन भरून येत...
डोळ्यातून झरून येत...
आई तू आठवते मला सतत गोतावळ्यात रमणारी,
आई तू आठवते मला कोणालाही जेवल्याशिवाय घर सोडू न देणारी,
आई तू आठवते मला सिनेमा-नाटकाची कथा सांगणारी,
आई तू आठवते मला मांडी वर डोकं ठेवल्यावर आमचीच नाव असलेली गाणी गाणारी,
आई तू आठवते मला जिवलगांच्या जाण्यानंतरसुद्धा धारदार चालणारी,
आई तू आठवते मला मुंबई सारख्या शहरात लहानपण जाऊनसुद्धा गावच्या मातीशी एकरूप होणारी,
आई तू आठवते मला जुनाट साड्यांतून गोधडी साकारणारी,
आई तू आठवते मला चुलीत आग फुकणारी,
आई तू आठवते मला हातावर शेंगुळी साकारणारी,
आई तू आठवते मला सुरकुतल्या हातांनी गाल कुरवळणारी,
आई तू आठवते मला थरथरत्या ओठांनी कपाळावर मुका घेणारी,
आई तू आठवते मला पप्पानी library मधून आणलेली पुस्तके जपाटलेल्या गत वाचणारी,
आई तू आठवते मला वाचलेल्या गोष्टी तुझ्या अनोख्या शैलीत सांगून आम्हाला मंत्रमुग्ध करणारी,
आई तू आठवते मला तुझ्या मम्मीला लग्नानंतर शिक्षण अन् नोकरीला प्रोत्साहन देणारी,
आई तू आठवते मला पाया पडल्यावर 'बाबासाहेबासारखा मोठा हो' असा आशिर्वाद देणारी,
आई तू आठवते मला शेवटच्या क्षणीसुद्धा डोळे उघडून आपल्या जिवलगांना आशीर्वाद देणारी
आई तू आठवते मला आम्हा सर्वांवर निस्सीम प्रेम बरसणारी...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मामा होताना

ती