Posts

Secret Box

Image
माणूस नेहमीच कधी निर्णय घेण्याच्या द्वंद्वात, कधी नात्या-भावनांच्या कोलाहलात इतका गुरफटून जातो की त्याला आपल्या हक्काचं कोणीतरी हवं असत मन मोकळं करण्यासाठी... आपल्या मतांच, आपल्या निर्णयांचा निष्कर्ष न काढता, जास्त उहापोह न करता हवा असतो फक्त एक श्रोता भावनांच्या वक्त्यासाठी... उत्स्फूर्त प्रतिसाद न देणारा फक्त संयमाने ऐकून काहीसं अपेक्षित धीर मिळण्यासाठी... आपल्या दुःखावर फुंकर नसेल पण या श्रोत्यामुळे खपली पकडेल या आशेसाठी... आपण सगळेच जण कोणकोणाचे असे श्रोते बनतोच, कधी  अशा वक्त्यांना सल्ले ही देतो त्यांना नको असताना... जीवनात दुखवल्याने, कधी निर्णयाच्या द्विधा मनस्थिती मध्ये, कधी भावनांच्या-नात्यांच्या कल्लोळात आपलं कोणीतरी ऐकून घेणारं असावं ही खूप स्वाभाविक अपेक्षा सर्वांची असते... एक confidential ची अट ही by Default या सोबत येते आणि मग आपण होतो त्या व्यक्तीचे secret box...  या secret बॉक्स मध्ये मग असंख्य व्यक्तीच्या नात्यांचे, भावनांचे, निर्णयांचे, चुकांचे, दानाचे, कटू अनुभवांचे, आतल्या जखमेचे असंख्य रहस्य आपण साठवत असतो वा कोणाला तरी secret बॉक्स मध्ये साठवण्यासाठी हवाल...

का...??? आत्या का...???

 लिला आत्याच्या स्मृतीस स्मरून... का आत्या का अशी अचानक सोडून गेलीस... का आत्या का असे तुझ्याबद्दल आदरांजली  बद्दल बोलायला लावलंस... तुझ्या सारख्या लुसलुशीत मऊ चपातीच गुपितच ठेवून गेलीस... का आत्या का आपल्या स्कॉलरशिप च्या अँप च  बोलणं अर्धवट टाकून गेलीस... तुझ्या मोत्यासारख्या अक्षराचं रहस्य न सांगताच गेलीस... का आत्या का शाळेतील मुलांच्या गमतीजमती पूर्ण न सांगताच गेलीस... तुझ्या लाडक्या सियाला न भेटताच गेलीस... टीचर आई म्हणणाऱ्या लहानांना(संचिता, केया, नव्या,  बिट्टू, परी, गोलू, सक्षम, नील, गोट्या, चिकू, सानू )  बाय न म्हणताच गेलीस... समीरदादाच्या शिट्टी ला प्रतिसाद न देताच गेलीस... बघ ग किती सैरभैर झालाय तुझा संगड्या, त्याला अस पोरकं करून गेलीस... का आत्या का तुझी संसारवेल पुन्हा फुलावी म्हणून सर्वात  आधी एकाकी  झगडणाऱ्या, पोरीकडं लक्ष दे असं  तुझ्या बाईला सतत बजावणाऱ्या तुझ्या दादाकडे  का पाठ फिरवून गेलीस... का आत्या का सहनशीलतेची परिसीमा केलीस... का आत्या का काही वर्षे यातनेची आव्हाने सहन करत  असताना काही दारे तुझ्यासाठी बंद होती आत...

मामा होताना

 जीवनात काही क्षण येतात, आणि तुमच्या प्रौढ झाल्याची जाणीव करून देतात... होय असंच घडतं, ३किलो १००ग्रॅमचा चिमुकला देह एका क्षणात तरूणपणाचं अन् पुन्हा लहानपणाचं, तामसी वृत्तीचं अन् थोड्याशा संयमीपणाचं, बेजबाबदार मुलाचं अन् जबाबदार मामाचं अंतर नाहीस करू पाहतो आहे... वाटलं नव्हतं इवलासा जीव इतक्या परिवर्तनाचं कारण ठरेल...! लहानपणी अनुभवलेल्या गोष्टी परत अनुभवू शकतो आहे, आता पुन्हा चिमणीची चिऊताई झाली, चंद्राचा पुन्हा चांदोमामा झाला, YouTube वरील Technology, Stand-up Comedy, News updates channels च्या subscription ची जागा कधी अंगाई गीते आणि बडबडगीतांनी घेतली हे समजलंच नाही. जाणवलं लहानपणी चा ससा अजूनही कापूस पिंजून ठेवला आहे तसाच आहे, 'लकडी की काठी', 'चांदोबा भागलास का' अजूनही मनाच्या कोपऱ्यात घर करून आहे... आठवणीतल्या गोष्टी परत परत घडत आहेत, १९ फेब्रुवारी पासून मी पुन्हा लहान झालो आहे अन् त्या चिमुकल्यासोबतचं मोठा होत आहे... मी माझ्यासोबत पुन्हा जगतो आहे...  Work From Home नावाचं भूत कोरोनाने पाठीवर दिलं अन् तामसी वृत्तीच आंदण आपसूक डोक्यात शिरलं. छोट्याशा गोष्टीवर ऑफिस आणि...

कांद्याची चटणी

काही दिवसांपूर्वी Mummy म्हटली, "काय करू खायला?" अनावधानाने मी देखील फर्माईश केली, "कांद्याची चटणी बनवं" मम्मी,"तुझी मोठी आई काय कांद्याची चटणी बनवतं होती...! आठवत आहे का तुला?" अरे हो! मोठी आई आणि कांद्याची चटणी समीकरण आमच्यासाठी कुतूहलाचं... कारण घरातील मोजक्या जिन्नसातून ती स्वादिष्ट चटणी साकारायची... ती अगदी कांदेही निवडून घेत नसतं अगदी तिला तिची सामाजिक, भौतिक अन् आर्थिक परिस्थिती निवडता आली नाही त्यामुळेचं कदाचित. मग विळा पाय आणि उंच-सकल अशा irregular जमिनीच्या मध्ये पकडून कांदा विळ्याच्या धारेवर पकडून हातांना जोर देत, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा जोर जसा तिच्या आयुष्यावर तसा कांदा बारीक करी... मग तिचा खोलगट तवा ती चुलीच्या धगधगत्या आगीवर ठेवी... तो जाळंही uniform नसे जणू तिला ठाऊक होत तोही तिच्या आयुष्याच्या अनिश्चितेसारखाच आहे मग ती तव्यात अंदाजानं तेलं टाकी, तिच्याकडे तेल वापरण्याचं कसब होतं गव्हाची पोळी वा पाट्यावरचा मसाला अन् तेलाचं मेळ आणि संसाराच्या गणिताचा मेळ ती अचूक साधे... बरं, त्या तापलेल्या तेलात ती असेल तर जिरं, मोहरी टाकत नाही...

एक दिन तुम भी देखोगे

एक दिन तुम भी देखोगे एक दिन तुम भी देखोगे, मुझे जिम्मेदारी लेते हुए... एक दिन तुम भी सुनोगे, मैफिलो में मुझे छाते हुए... एक दिन तुम भी गुरुर करोगे, जुनुन से रास्ता काटते हुए... एक दिन तुम भी फ़िक्र छोडोगे, गहरी साजिस में भी मुझे इन्सान बनते हुए... एक दिन तुम भी नाज करोगे, माँ तेरा खयाल करते हुए...

ती

ती खूप वेंधळी, बडबडी, स्वप्नाळू खर सांगायचं तर irritating; पण तरी का कुणास ठाऊक वेगळा गुण आहे की, ती सर्वांना आपलंसं करते. सर्वांचा आदर करणारी, तत्वनिष्ठ पण कधी-कधी अर्धवट ज्ञानानं हसू करवून घेणारी. सर्वांपेक्षा अगदी निराळी कधी खूप एकाकी वाटणारी तर कधी मित्रमैत्रिणींच्या गर्दीत हरवणारी-सर्वांना सामावून घेणारी. उगाचंच कुणावरही हक्क गाजवत नाही; पण कधी सर्वांना गुलाम देखील बनवणारी. प्रत्येक भेटीच्या वेळी तिची नव्याने ओळख होते. कधी आई बनून माया केली. कधी मैत्रीण बनून साथ दिली. कधी बाप बनून जबाबदारीची जाणीव करून दिली. कधी शिक्षक बनून खूप काही शिकवलं. कधी तत्त्ववेत्ता बनून उपदेश केला, तरीदेखील स्वतःपासूनचं अजाण राहिली. होय ती, तीच... उगीचंच अबोला धरणारी अन् काही काळाने स्वतःहून रुसवा सोडणारी ती... थोडी अल्लड, थोडी निरागस, स्वतःमध्ये लहानपण जपणारी ती... कधी विसरावं म्हटलं तर स्वतः आठवण करून देणारी ती... स्वप्नात रमणारी, इतरांच्या समस्याने ग्रासलेली ती... कधी हास्यामध्ये आसू लपवणारी ती... सूर्योदयाची वाट न बघता अंधारामध्येही दिवा लावण्यासाठी झटणारी ती... वेंधळी, बडबडी...

माणूसपण

काही दिवसांपूर्वी room पासुन काही अंतरावर 2 two wheeler चा accident झाला; एका गाडीवर बसलेली महिला पडून तिच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला... बघ्यांची गर्दी वाढू लागली. मी पण माझी गाडी थांबवून त्या दिशेने गेलो... काही लोक गाडी उचलून देत होते, काही पडलेल्या लोकांना उचलत होते... पण त्या महिलेला सावरण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते... काही लोक गाडीवरूनच अपघात न्याहाळून आपला प्रवास अखंडतेने करत होते... अचानक 2दिवसांपूर्वी ज्या 6 seater मध्ये मी प्रवास केला तो Driver-ज्यानं त्यादिवशी एका मावशींसोबत काही रूपायांवरून आकाश-पाताळ एक केलं तो आला... त्याने त्या अपघातग्रस्त महिलेला रस्त्याच्या कडेला घेतलं आणि त्याच्या गाडीतील दोन मुलींना त्याच्या रांगड्या शैलीत आवाज दिला आणि डोकं-कान पकडा असा थेट आदेश दिला... कोणास ठाऊक कुठून तरी पाण्याची bottle आणून तिच्या माथ्यावर पाणी मारायला सांगून त्या महिलेसोबत असणाऱ्या मुलाला धमकी वजा आदेश दिला आणि पुन्हा स्वतःच्या गाडीतील प्रवाशाला एखादी गाडी थांबण्यास सांगून अपघातग्रस्त गाडी उचलणाऱ्या मला अक्षरशः ओढून त्या महिलेसोबतच्या मुलाला घेऊन जाण्याचा आदेश दिला... म...