मोठी आई

मोठी आई

आई, काही पक्क्या कच्च्या धाग्यात विणलेल्या असंख्य आठवणी आज मनात दाटून आल्या आहेत...
तुझ्याबद्दल बोलताना,
मन भरून येत...
डोळ्यातून झरून येत...

आई आठवते पुसटशी तू मला सुप्रियाला पाठीशी अन बोट पकडून मधुराताई तुझ्या मुंगीला घेऊन कामं उरकणारी,
आई आठवते तू मला
चुलीत आग फुकणारी,
आई आठवते तू मला धगधगत्या निखाऱ्या वर भाकऱ्या भाजणारी,
आई आठवते तू मला, कितीही दमून आली तरी नेहमीच डोकं-अंग दुखणाऱ्या दादा वर उपचार करणारी...
आई आठवते तू मला, मानसिक-शारीरिक वेदनासहन करून सुद्धा नातलगांना सांभाळणारी...
आई आठवते तू मला, शेतात राब राब राबणारी आणि घरी आल्यावर तुझ्या खडबडीत हातांनी पाट्यावर मसाला वाटणारी,
आई आठवते तू मला, कोणाचीही पर्वा न करता माझे लाड करणारी,
आई आठवते तू मला, सुट्टीच्या प्रत्येक दिवशीच्या रात्री 'लेकराकडून किती काम करून घेतलं' म्हणत कुरवळणारी...
आई आठवते तू मला, जरी Mummy च्या शिक्षण आणि नोकरी आई (बारकी) पाठिंबा दिला तरी त्या साठी लागणार वातावरण निर्माण करणारी...
आई आठवते तू मला, कोणालाही आपल्या ताटात जेवू घालणारी...
आई आठवते तू मला, अपार दुःख सहन करणारी...
आई आठवते तू मला, कष्टाची तळी उचलून धारदार चालणारी...
आई आठवते तू मला, आजाराच्या छळछावणीतल्या यातना सहन करणारी...
आई आठवते तू मला, अपार कष्ट, प्रेमळ स्वभाव आणि नियतीशी अविरत झगडत आमचं अविभाज्य जीवन बनलेली...
आई आठवतेस तू मला... आई आठवतेस तू मला...

Comments

Popular posts from this blog

आजी

मामा होताना

ती