का...??? आत्या का...???
लिला आत्याच्या स्मृतीस स्मरून...
का आत्या का अशी अचानक सोडून गेलीस...
का आत्या का असे तुझ्याबद्दल आदरांजली
बद्दल बोलायला लावलंस...
तुझ्या सारख्या लुसलुशीत मऊ चपातीच गुपितच ठेवून गेलीस...
का आत्या का आपल्या स्कॉलरशिप च्या अँप च
बोलणं अर्धवट टाकून गेलीस...
तुझ्या मोत्यासारख्या अक्षराचं रहस्य न सांगताच गेलीस...
का आत्या का शाळेतील मुलांच्या गमतीजमती
पूर्ण न सांगताच गेलीस...
तुझ्या लाडक्या सियाला न भेटताच गेलीस...
टीचर आई म्हणणाऱ्या लहानांना(संचिता, केया, नव्या,
बिट्टू, परी, गोलू, सक्षम, नील, गोट्या, चिकू, सानू )
बाय न म्हणताच गेलीस...
समीरदादाच्या शिट्टी ला प्रतिसाद न देताच गेलीस...
बघ ग किती सैरभैर झालाय तुझा संगड्या,
त्याला अस पोरकं करून गेलीस...
का आत्या का तुझी संसारवेल पुन्हा फुलावी म्हणून सर्वात
आधी एकाकी झगडणाऱ्या, पोरीकडं लक्ष दे असं
तुझ्या बाईला सतत बजावणाऱ्या तुझ्या दादाकडे
का पाठ फिरवून गेलीस...
का आत्या का सहनशीलतेची परिसीमा केलीस...
का आत्या का काही वर्षे यातनेची आव्हाने सहन करत
असताना काही दारे तुझ्यासाठी बंद होती आता सुखाची
चाहूल लागताच का त्यांचा जत्थाच गोळा केलास...
का आत्या का आयुष्यभर नैतिकतेने चाललेली तू
सहजासहजी अनैतिकतेला माफ केलंस,
अन् शीलहीनतेला आसरा दिलास...
का आत्या का आतल्या आत मूक रडत राहिलीस...
इतकं दुःख सहन का करत राहिलीस...
का आत्या का तुझ्या प्रेमळ भावांना हाक नाही दिलीस...
का सतत देतच राहिलीस का सतत
दुसऱ्यांच्या विचार करत राहिलीस...
का आत्या का शेवटी सुद्धा चेहरा न दाखवताच गेलीस...
का आत्या का...???
Comments
Post a Comment