Secret Box
माणूस नेहमीच कधी निर्णय घेण्याच्या द्वंद्वात, कधी नात्या-भावनांच्या कोलाहलात इतका गुरफटून जातो की त्याला आपल्या हक्काचं कोणीतरी हवं असत मन मोकळं करण्यासाठी...
आपल्या मतांच, आपल्या निर्णयांचा निष्कर्ष न काढता, जास्त उहापोह न करता हवा असतो फक्त एक श्रोता भावनांच्या वक्त्यासाठी...
उत्स्फूर्त प्रतिसाद न देणारा फक्त संयमाने ऐकून काहीसं अपेक्षित धीर मिळण्यासाठी...
आपल्या दुःखावर फुंकर नसेल पण या श्रोत्यामुळे खपली पकडेल या आशेसाठी...
आपण सगळेच जण कोणकोणाचे असे श्रोते बनतोच, कधी अशा वक्त्यांना सल्ले ही देतो त्यांना नको असताना...
जीवनात दुखवल्याने, कधी निर्णयाच्या द्विधा मनस्थिती मध्ये, कधी भावनांच्या-नात्यांच्या कल्लोळात आपलं कोणीतरी ऐकून घेणारं असावं ही खूप स्वाभाविक अपेक्षा सर्वांची असते... एक confidential ची अट ही by Default या सोबत येते आणि मग आपण होतो त्या व्यक्तीचे secret box...
या secret बॉक्स मध्ये मग असंख्य व्यक्तीच्या नात्यांचे, भावनांचे, निर्णयांचे, चुकांचे, दानाचे, कटू अनुभवांचे, आतल्या जखमेचे असंख्य रहस्य आपण साठवत असतो वा कोणाला तरी secret बॉक्स मध्ये साठवण्यासाठी हवाली करतो... हा secret बॉक्स अगदी नाजूक तलम विश्वासाच्या कापडाने विणलेला असतो... जर आपण कोणाचे secret बॉक्स होऊन रहस्ये सांभाळत असू तर खूप मोठी जबाबदारी येते, विश्वासाचा धागा निसटू न देण्याची... हळुवार कानातील फुंकर मनात विरून शमवण्याची ताकत आपल्यात हवी की ती फुंकर वादळ होऊन तोंडावाटे बाहेर फेकण्याची दुर्बलता हवी याचा निर्णय जो तो घेत असतो... आपण कोणाला त्याचे रहस्य सांगावे इतकी कोणासाठी विशेष स्थिती निर्माण देऊ शकत असलो तर आपण किती special आहोत, ही भावना देखील सुखावणारी आहे... अन् जबाबदारीची देखील...
आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक राहून कुणाशी share करत असू आणि तो secret box ही त्या emotions ला कोणतेही tags, Labels न लावता फक्त समजून घेऊ शकेल; चुकत असेल तर टोकेल but या sharing नंतर देखील त्या व्यक्ती आणि secret बॉक्स मध्ये कोणतेही ackward silence नसेल... आपल्या मनाचा एक नाजूक कोपरा secret बॉक्स कडे अगदी सुरक्षित असल्याचं समाधानच असेल, तर secret बॉक्सची जबाबदारी अन् मैत्र वाढत जातं... मन हलकं करायला कोणी मिळणं आजच्या जगात दुरापास्त होत आहे अन् ज्याला सांगितलं तो विश्वासाला पात्र आहे की नाही याची धाकधूक... मन हलकं करतो तेव्हा overthinking, suicidal thoughts, डिप्रेशन सारख्या कित्येक समस्यांपासून बाहेर येण्यासाठीचं पहिलं पाऊलं असतं... म्हणून प्रत्येकाला एकतरी हक्काचा secret बॉक्स असावा आणि आपणही कुणाच्यातरी secret बॉक्स जरूर व्हावं...
आज कोणाची suicide, मानसिक स्वास्थ्याची गोष्ट ऐकली की अशा secret बॉक्सची गरज प्रकर्षाने जाणवते...
.jpeg)
Comments
Post a Comment