माणूसपण

काही दिवसांपूर्वी room पासुन काही अंतरावर 2 two wheeler चा accident झाला; एका गाडीवर बसलेली महिला पडून तिच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला... बघ्यांची गर्दी वाढू लागली. मी पण माझी गाडी थांबवून त्या दिशेने गेलो... काही लोक गाडी उचलून देत होते, काही पडलेल्या लोकांना उचलत होते... पण त्या महिलेला सावरण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते... काही लोक गाडीवरूनच अपघात न्याहाळून आपला प्रवास अखंडतेने करत होते... अचानक 2दिवसांपूर्वी ज्या 6 seater मध्ये मी प्रवास केला तो Driver-ज्यानं त्यादिवशी एका मावशींसोबत काही रूपायांवरून आकाश-पाताळ एक केलं तो आला... त्याने त्या अपघातग्रस्त महिलेला रस्त्याच्या कडेला घेतलं आणि त्याच्या गाडीतील दोन मुलींना त्याच्या रांगड्या शैलीत आवाज दिला आणि डोकं-कान पकडा असा थेट आदेश दिला... कोणास ठाऊक कुठून तरी पाण्याची bottle आणून तिच्या माथ्यावर पाणी मारायला सांगून त्या महिलेसोबत असणाऱ्या मुलाला धमकी वजा आदेश दिला आणि पुन्हा स्वतःच्या गाडीतील प्रवाशाला एखादी गाडी थांबण्यास सांगून अपघातग्रस्त गाडी उचलणाऱ्या मला अक्षरशः ओढून त्या महिलेसोबतच्या मुलाला घेऊन जाण्याचा आदेश दिला... मी त्या मुलाला घेऊन  माई मंगेशकर hospital ला गेलो. नंतर हॉस्पिटलमध्ये तो driver नाही दिसला पण त्या महिलेला घेऊन आमच्या मागे एक 4 wheeler आली... आणि त्यांच्यावर उपचार सुरु झाले. त्या गर्दीमध्ये खूप लोक मदत करत होते. पण त्या मदतीला सुसूत्रता आणणारा तो त्यादिवशी आघाव वाटलेला आणि आज अचानक देवदूत वाटलेला-driver लक्षात राहिला. घरी जाताना मग हाच विचार येत होता की आपण किती लवकर कोणाच्याही विषयी निष्कर्ष काढून मोकळे होतो, त्यांना न ओळखता. मग अचानक अजुन एक अपघाताचा प्रसंग आठवला- माझा  बारावी चा result पाहण्यासाठी मामाच्या गावावरून संगमनेरला cyber कॅफे मध्ये जात असताना चंदनापुरी घाटातील भीषण अपघातामध्ये माझा मावसभाऊ ज्याला सगळे नातलग स्वार्थी समजतात त्याने केलेली मदत आठवली. आणि मग माणसातील देवपण जाणवलं. मग विचार केला ह्या दोघांनी बुद्धिजीवी माणसाचं कर्तव्य केलं होतं देवाचं नाही. त्यांनीं माणूसपण जपलं. बाकी लोकांना नाही जमलं म्हणून त्यांना देवपण...! जे माणूसपण मी FC रोड ला icecream मागणाऱ्या त्या केविलवाण्या मुलाला कितीतरी विनवण्या करून 'नाईलाजाने' देऊ करून आणि एक मुलगी सायकल वरून पडल्यावर मुलगी म्हणून उचलू की नको हा विचार करणारा मी, public transport मध्ये एखाद्या वृद्ध वा लेकुरवाळी महिलेला आपली जागा द्यावी की नाही हा गहन विचार करणारा मी, माणूसपण जपलं म्हणून स्वतःला great समजत होतो.
मग असे काही प्रसंग मी किती लहान मनाचा आहे याची जाणीव करून देतात. आणि मी माणुसपणा पासून खूप दूर असल्याची प्रचिती करवून देतात. आणि इतरांना एका चौकटीच्या आतमध्ये judge करणाऱ्या माझीचं मला लाज वाटते. आणि Mother Teresa यांच्या "If you judge people, you have no time to love them" ह्या वाक्याचा पुन्हा साक्षात्कार होतो.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आजी

मामा होताना

ती